लाडकी बहीण योजनेबद्दल मोठे अपडेट ! लाभार्थ्यांच्या बँक खात्यात आधी फक्त 1 रुपयाच जमा होणार

Ladki Bahin Yojana DBT : राज्य सरकारच्या  वतीनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेचा अर्ज दाखल करण्यासाठी गावा-खेड्यांसह शहरांतही मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. अशातच आता रक्षाबंधनाच्या दिवशी या योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्यांचे हफ्ते एकत्र जमा केले जाणार आहेत. त्यासाठी Ladki Bahin Yojana DBT तांत्रिक पडताळणीला सुरुवात झाली आहे. अशातच काही निवडक अर्जदारांच्या बँक खात्यांत प्रायोगित तत्त्वावर प्रत्येकी एक रुपया जमा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. हा केवळ तांत्रिक प्रक्रियेचा भाग असून याबाबत कोणत्याही प्रकारचा गैरसमज बाळगू नका, असं आवाहन महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केलं आहे.

निवडक अर्जदार महिलांच्या बँक खात्यात 1 रुपया जमा करणार : अदिती तटकरे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत महिला आणि बालविकास विभागाकडे 1 कोटी हून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर काही निवडक अर्जदार महिलांच्या बँक खात्यात 1 रुपया जमा करणार आहोत. हा 1 रुपया सन्मान निधी नसून तांत्रिक पडताळणीचा भाग असेल. तेव्हा यासंदर्भात माता भगिनींनी कोणत्याही प्रकारच्या अपप्रचाराला आणि गैरसमजाला बळी पडू नये, असं आवाहन करते.

 

लाडकी बहीण योजनेची पहिली यादी जाहीर ! यादीत नाव पहा

 

 

लाडकी बहीण योजनेचे तुमचे स्टेटस चेक करा ! अर्ज मंजूर की रद्द ?

 

Leave a Comment