मोदी सरकारची योजना यांना मिळणार मोफत आयुष्यभर वीज असा करा अर्ज

PM surya ghar yojna : केंद्रीय अर्थसंकल्प 2024 अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेंतर्गत आलेल्या अर्जांची त्यांनी माहिती दिली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत आतापर्यंत 1.28 कोटी नोंदणी आणि 14 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. या योजनेतून तुम्हाला 300 यूनिटपर्यंत मोफत वीज मिळणार आहे. ही योजना काय आहे. जाणून घ्या.

 

👉 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈

 

15 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेच्या माध्यमातू देशातील सुमारे 1 कोटी कुटुंबांना दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज पुरवण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे. सूर्य घर मोफत वीज योजनेंतर्गत तुम्हाला सौर पॅनेल खरेदी करण्यासाठी सरकारकडून अनुदान दिले जाते.

 

👉 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈

 

सूर्य घर मोफत वीज योजनेंतर्गत जर एखाद्या व्यक्तीने PM surya ghar yojna घराच्या छतावर विजेसाठी सौर पॅनेल विकत घेतले तर सरकार 1 किलोवॅटच्या सौर पॅनेलवर 30,000 रुपये, 2 किलोवॅटच्या सौर पॅनेलवर 60,000 रुपये आणि 3 किलोवॅट सौर पॅनेलवर जास्तीत जास्त 78,000 रुपये अनुदानाची रक्कम दिली जाते.

Leave a Comment